जय महाराष्ट्र न्यूज, खारघर
खारघरमध्ये अंसवेदनशीलतेचा कळस बघायला मिळाला. नवी मुंबईच्या खारघर सेक्टरमध्ये शनिवारी घडलेल्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय.
खारघर सेक्टर 12 मध्ये राहणारी शिल्पा पुरी दुचाकीवरून जात होती. खड्ड्यामुळं तीचा तोल गेला आणि ती खाली पडली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या क्रेननं तिला चिरडलं.
या भीषण अपघातात शिल्पाचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या अपघातानंतर 10 ते 15 वाहनं इथून गेली. पण, एकानंही या मुलीच्या जवळ जाण्याचा अथवा तिला मदत करण्याचा प्रयत्न केला नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.