वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयानं खाप पंचायतींना जोरदार झटका दिला आहे. सज्ञान असलेलं जोडपं परस्पर सहमतीने लग्न करत असेल तर त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे लग्नासंबंधी खाप पंचायतीनं दिलेले आदेश बेकायदेशीर आहेत, असा ऐतिहासिक निर्णय न्यायालयानं मंगळवारी दिला.
सर्वोच्च न्यायालयात एका ऑनर किलिंग प्रकरणावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं खाप पंचायतींना धक्का देणारा ऐतिहासिक निकाल दिला. केंद्र सरकार जोपर्यंत याबाबत कायदा तयार करत नाही, तोपर्यंत हा आदेश लागू राहील, असंही न्यायालयानं सांगितलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.