खडसे, बाहुबली आणि कटप्पा !

खडसे, बाहुबली आणि कटप्पा !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कटप्पानं बाहुबलीला का मारलं याचं उत्तर अवघा देश शोधत होता. पण, विधीमंडळातही हा मुद्दा गाजला.

 

वाट मोकळी करत विरोधकांची संघर्ष यात्रा थेट जळगावच्या मुक्ताईनगरमधल्या खडसेंच्या दारात दाखल झाली होती यामुळे राजकीय वर्तुळात तेव्हा एकच खळबळ उडाली.

 

अनेक तर्क वितर्क लढवले गेले. पण याचं उत्तर ना खडसेंनी दिलं ना विरोधकांनी. पण, हाच मुद्दा गाजला तो जीएसटीसाठी बोलावलेल्या विधीमंडळ अधिवेशनात.

 

कटप्पानं बाहुबलीला का मारलं याचं उत्तर मिळवण्यासाठीच आम्ही एकनाथ खडसेंच्या घरी गेलो होती अशी कोपरखळी जयंत पाटील यांनी मारली आणि सभागृहात एकच

हशा पिकला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version