केसीआर यांच्या स्वागताला बोकडाचा बळी

केसीआर यांच्या स्वागताला बोकडाचा बळी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. त्यांचं सम्पूर्ण मंत्रिमंडळच महाराष्ट्रात येणार आहे. चंद्रशेखर राव राज्यात मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, केसीआर यांच्या स्वागताला बोकडाचा बळी देण्यात आला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे धाराशिव जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आले. तेलंगणाचे आमदार व मंत्रीमंडळासह बीआरएस चे पदाधिकारी यांच्या सह ते हा दौरा करणार आहेत. यावेळी उमरगा मुरूम तालुक्यातील उमरगा मोड येथे त्यांच्यासाठी खास उस्मानाबादी बोकडाच्या मटणाची मेजवानी करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली आहे. के सी आर हे मंगळवारी पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणार असून त्यानंतर तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version