पडद्यावर पुन्हा झळकणार कतरिना आणि सलमानची जोडी…

पडद्यावर पुन्हा झळकणार कतरिना आणि सलमानची जोडी…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

प्रियंका चोपडाने अचानक ‘भारत’ या चित्रपटातून एक्झिट घेतल्यानंतर भारतसाठी नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु होता आणि यावेळी अनेक बॉलीवुड अभिनेत्रींच्या नावाची चर्चा रंगली.

मात्र आता अखेर भारतसाठी कतरिनाचे नावावर शिकामोर्तब करण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वत: चित्रपटाचे दिग्दर्शक अल्ली अब्बास जफर यांनी ‘मुंबई मिरर’सोबत संवाद साधताना दिली आहे.

यानिमित्त चाहत्यांना आता पुन्हा एकदा सलमान आणि कतरिनाची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

भारत सिनेमामध्ये प्रियंका आणि सलमान खानची जोडी खुप वेळानंतर पदड्यावर झळकणार होती मात्र निकसोबत लग्नाच्या कारणास्तव प्रियंकाने भारत सिनेमातून एक्झिट घेतली.

प्रियंकाने भारत सिनेमातून बाहेर पडल्याची माहिती अली अब्बास जफर यांनी ट्वीटद्वारे दिली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version