महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खेड येथील सभेत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी रत्नागिरीतील बरसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवला. आपल्या भाषणात त्यांनी जागतिक वारसा लाभलेल्या कातळशिल्पाचा प्रामुख्याने उल्लेख केला. तर कातळशिल्प म्हणजे काय ?
कोकण हा प्रदेश त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे ओळखला जातो. परंतु याच कोकणात प्राचीन आणि मध्ययुगीन ऐतिहासिक वास्तूंचा वारसा देखील आहे. याच कोकणात अश्मयुगीन माणसाच्या पाऊल खुणा असणारे शेकडो कातळशिल्प आहेत. तर आता कातळ शिल्प म्हणजे काय ? तर कातळशिल्पांना खोदशिल्प म्हटले जाते. जगभरात याला रॉक आर्ट, पेट्रोग्लिप्स किंवा जिओग्लिप्स अशी वावगेळी नवे आहेत. डोंगरमाथ्यावरील खड्यावर कोरलेली ही कातळशिल्पे आपल्या युगातील कथा सांगत असतात. आदिमानवाने दगडात कोरुन ठेवलेली अशी शेकडो कातळशिल्पे कोकणात आढळतात. या कोरीव चित्रांमध्ये विविध प्राणी, पक्षी तसेच काही नक्षीकाम केलेले आढळून येते. एका वृत्तानुसार 1990 मध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी येथे रस्त्याचे काम करताना जांभ्या दडगाच्या सड्यावर बारसू येथील कातळशिल्प आढळली होती. आदिमानव निर्मित या कातळशिल्पावर २ वाघांच्या मध्ये एक मानव सदृश आकृती कोरलेली दिसून येते. हे चित्र १७.५० मीटर लांब तर ४.५० मीटर रुंद जमिनीवर कोरलेले आहे. यात काही भौमितिक रचना देखील आपल्याला पाहायला मिळतात. २०१९ मध्ये युनेस्कोने आदिमानवाच्या संस्कृतीचा पुरावा जपणाऱ्या या कातळशिल्पाची जागतिक वारसा जपणाऱ्या वास्तूंच्या यादीत नोंद केली. त्यामुळेच अशा वास्तूच्या आसपास कोणताही मोठा प्रकल्प युनेस्कोच्या परवानगीशिवाय करता येत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.