वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात एल्गार पुकारत तब्बल 15 दीड दशकानंतर काश्मिरात कासो ऑपरेशन राबवण्याची तयारी केली आहे.
घेराव घालणे आणि शोध मोहीम अशा पद्धतीचं ऑपरेशन राबवणं लष्कराने 15 वर्षांपूर्वी बंद केलं होते. लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कासोचा वापर काश्मीरमधील दहशतवाद
प्रभावित कुलगाम, पुलवामा, तराल, बडगाम आणि शोपियां येथे मोठ्या प्रमाणात केला जाईल.
2001 नंतर गोपनीय माहिती मिळाल्यानंतरच घेराव घालणे आणि शोध मोहीम चालवण्यात आली. नुकतंच काश्मीरमधील युवा सैन्य अधिकारी लेफ्टनंट उमर फयाज यांची शोपियांमध्ये
दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यामुळे लष्कराने कासो ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.