डी कंपनीचे शार्प शूटर रातोरात भूमिगत झाले; इक्बालचे एकामागोमाग एक खुलासे

डी कंपनीचे शार्प शूटर रातोरात भूमिगत झाले; इक्बालचे एकामागोमाग एक खुलासे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला आणखी 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

 

खंडणी मागितल्याप्रकरणी इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं अटक केली.

 

दरम्यान कासकरची चौकशी करताना अनेक महत्तवाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. तसेच त्याच्या साथीदारांनाही ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

 

इक्बालच्या अटकेनंतर डी कंपनीचे शूटर रातोरात अंडरग्राऊंड झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या चौकशीतून पुढे आली. याआधी इक्बालनं महत्त्वाची माहिती आयबी आणि पोलिसांना दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version