वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये काश्मीरमध्ये पसरलेलं अशांत वातावरणावर चर्चा पार पडली.
तसेच काश्मीरमध्ये वाढलेल्या हिंसाचारावर चर्चा करुन तोडगा निघू शकतो, असं मतदेखील मुफ्तींनी व्यक्त केले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये सतत वाढलेल्या दगडफेकीच्या घटनांमागे काश्मीरमध्ये सक्रिय असलेले 300 व्हॉट्सॲप ग्रुप असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.
काश्मीरमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद केल्याने सुरक्षा दलांवरील दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातील ऑपरेशनमध्ये अडथळा आणण्यासाठी आणि सुरक्षा दलांवर
दगडफेक करण्यासाठी तरुणांना व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून भडकावलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून चकमकीच्या ठिकाणी दगडफेक करणाऱ्या तरुणांना एकत्र केलं जात होतं आणि सुरक्षा दलांच्या ऑपरेशनला अडथळा आणण्यासाठी दगडफेक करण्यात येते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.