कार्ती चिदम्बरमचा जामीन अर्ज फेटाळला

कार्ती चिदम्बरमचा जामीन अर्ज फेटाळला

व्हिसा घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार कार्ती चिदम्बरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआय न्यायालयाने कार्ती चिदम्बरम यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे कार्ती चिदम्बरम यांना आणखी काही दिवस कोठडीतच राहावे लागणार आहे. कार्ती चिदम्बरम यांनी सुटकेसाठी जामीन अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी आज सीबीआय न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

कार्ती चिदम्बरम यांच्यावर २५० चिनी कामगारांना नियमबाह्य पद्धतीने मर्यादेपेक्षा अधिक प्रकल्प व्हिसा मिळवून देण्यासाठी ५० लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे. या व्हिसा घोटाळाप्रकरणी कार्ती चिदम्बरम यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सुटकेसाठी त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र सीबीआय न्यायालयाने कार्ती चिदम्बरम यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी कार्ती चिदम्बरम यांच्या ७ मालमत्तांवर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीमध्ये मुंबई, दिल्ली आणि तामिळनाडू या मालमत्तांचा समावेश होता. तसेच चीनी कामगारांना व्हिसा देण्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना अटक झाली असून आज त्यांच्या जामिनावर सुनावणी पार पडली असून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version