पाहा हे भाजपावर खोचक टीका करणारे आणखी एक व्यंगचित्र…

पाहा हे भाजपावर खोचक टीका करणारे आणखी एक व्यंगचित्र…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकच्या राजकीय घडामोडींवर व्यंगचित्र काढत भाजपावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने भाजपाच्या तोंडातून घास हिसकावून कर्नाटकात सत्ता स्थापन केली याचाच दाखला देत घशात हात घालून सत्ता बाहेर काढली!असा आशय देत राज ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटलं आहे.

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या घशातून काँग्रेस सत्ता बाहेर काढताना या व्यंगचित्रातून दिसत आहे.

याआधीही राज ठाकरेंनी ‘परतीचा पाऊस’ भाजपसाठी तापदायक ठरत असल्याचा टोलाही व्यंगचित्र रेखाटून लगावला होता.

तसचं महात्मा गांधींजींच्या जयंतीनिमित्तही राज ठाकरेंनी मोदी सरकारला लक्ष्य करत व्यंगचित्र रेखाटले होते. ‘एकाच मातीतील दोघे’ असे शीर्षक त्यांनी या व्यंगचित्राला दिले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version