कर्नाटक: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बसवराज बोम्मई यांच्या नावावर पक्षानं शिक्कामोर्तब केलं.
बसवराज बोम्मई यांनी आज ११ वाजता मुख्यमंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी बसवराज बोम्मई यांना शपथ दिली. शपथविधीच्या वेळी माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पासुद्धा उपस्थित होते. बोम्मई हे कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री ठरले आहेत.
बसवराज बोम्मई यांचा राजकीय प्रवास
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.