जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
करीरोड स्थानकाजवळ पादचारी पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. त्यासाठी अजस्त्र उपकरण हलवत असतानाच, पाया सरकल्याने हे उपकरण कलंडून त्याचा काही भाग लोकलच्या निकट पोहोचला.
सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अफवा पसरत गेली. रेल्वेने या अफवेचे खंडन केले असून सुरक्षेवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले.
पादचारी पुलासाठी खोदकाम सुरू असतांना उपकरणे अन्यत्र नेली जात होती. त्याचवेळी ट्रायपॉड सरकल्याने हा भाग लोकलच्या दिशेने कलंडला. सकाळी 9.50च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर लोकल सेवा थांबविण्यात आली होती.
साधारण सात मिनिटे वाहतुकीवर परिणाम झाला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.