करीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

करीना कपूरच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

बेबो म्हणजे सर्वांची आवडती स्टाईलिश आयकॉन अभिनेत्री करिना कपूर. बेबोचा आज 38वा वाढदिवसानिमित्त तिच्या काही खास गोष्टी जाणून घ्या.

 

करीनाहे नाव सुचलं कसं?

करिना कपूर यांचे आजोबा राज कपूर यांनी करिनाचे नाव सिध्दीमा ठेवायचं ठरवलं होतं. मात्र करिनाची आई गर्भवती असताना त्या अॅना करेनिना हे पुस्तक वाचत असताना त्यांना करिना हे नाव फार आवडले. बेबोचा जन्म झाल्यानंतर त्यांनी तिचे नाव करिना असं ठेवलं.

ही फिल्मी हस्तीही करिनाची नातलग-

कपूर घराण्यातील प्रत्येक पिढीत अनेक अभिनेते म्हणून बॉलिवूडमध्ये गाजले. मात्र करीना कपूरची आई बबिताही अभिनेत्री होती आणि प्रसिद्ध अभिनेत्री साधना ही बबिता यांची चुलत बहिणी आहे. म्हणजेच साधना या करिना कपूरची चुलती आहे.

 

करिनाची खास मैत्रीण

बॉलिवूडमध्ये आपली एकही फ्रेण्ड नाही, असं करीना म्हणते. अनेक मुलाखतींमध्ये तिने आपण इथे काम करायला आलो आहोत, मैत्री करायला नाहीअसं विधानही केलं. पण अभिनेत्री अमृता अरोरा ही मात्र अपवाद आहे. मलायका आरोरा आणि तिची बहीण अमृता आरोरा या करीनासोबत जवळपास प्रत्येक पार्टीमध्ये असतात. आऊटडोअर पिकनिक असो किंवा हाऊस पार्टी… करीनासोबत सैफ अली असो वा नसो, अमृता ही तिच्यासोबत असतेच असते.

 

 

करिनाचा मेणाचा पुतळा –

लंडनच्या मादाम तुसाद वॅक्स म्युझियममध्ये जगभरातल्या नामांकीत व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत. यामध्ये ज्या मोजक्याच भारतीय व्यक्तिमत्त्वांचे मेणाचे पुतळे आहेत, त्यात गांधी, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, हृतिक रोशन, ऐश्वर्या राय- बच्चन, सचिन तेंडुलकर यांच्या बरोबरीने करीना कपूरचा मेणाचा पुतळा पाहायला मिळतो.

 

करिना अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम गायिकाही

करीना कपूरचा अभिनय तर आपण पाहिलाच आहे. पण फार कमी लोकांना माहीत असेल, की करीना ही उत्तम गायिकाही आहे. तिने संगीताचं शास्त्रीय शिक्षण घेतलं नसलं, तरी तिचा आवाज गोड आहे आणि संगिताची उत्तम जाणही आहे. देव या श्याम बेनेगल यांच्या सिनेमात तिने अभिनयासोबतच जब नहीं आये थे तुम हे गाणे करिना कपूरने गायलं होतं. विशेष म्हणजे या गाण्यामध्ये फक्त तिचाच आवाज आहे, इतर कोणतंही वाद्य या गाण्यात वाजवण्यात आलेलं नाही.

 

 

स्टाईल आयकॉन-

बेबोला बॉलिवूडची स्टाईल आयकॉन म्हटलं जातं. अनेक नामांकीत आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची ती ब्रँड अँबेसडर आहे. तिला शॉपिंग करायला खूप आवडते. ती प्रत्येक वेळी वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसते. अनेक नव्या फॅशन ट्रेंड्सची ती ट्रेण्डसेंटर ठरली आहे. करिना डायमंड्ससाठी फार क्रेझी आहे.

गाडयांचे क्रेझ-

करीनाला 4 व्हीलर गाड्यांची फार आवड आहे. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, रेंज रोवर सारख्या महागड्या गाड्या ही बेबोकडे आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version