मुंबई, १५ मे २०२३, प्रतिनिधी : सुप्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्मा याच्या विनोदांचे लाखो दिवाणे आहेत. कपिलची विनोदबुद्धी आणि विनोदाचा वेळ अप्रतिम आहे. यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कपिल शर्माचा त्याच्या मुलीसोबत एक गोड व्हिडिओ समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे.
विनोदवीर अभिनेता कपिल शर्मा याने मातृदिनानिमित्त बेटी फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी तो मुलगी अनायरा शर्मासोबत रॅम्प वॉक करताना दिसला.या कार्यक्रमात कपिल सह भारती सिंह देखील आपला मुलगा लक्ष सोबत सहभागी झाली होती.पहिले कपिल शर्मा त्याच्या मुलीसोबत आणि नंतर भारती तिच्या लेकासोबत रॅम्प वॉक करताना दिसले. तत्यांचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
या व्हिडिओत कपिल त्याच्या 3 वर्षाच्या मुलीचा हात धरून रॅम्पवर उतरला होता. यावेळी दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.तर नंतर भारती सिंग देखील तिचा मुलगा लक्ष सोबत रॅम्प वॉक करताना दिसली. भारतीसोबत कृष्णा अभिषेक देखील होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.