कपिल शर्माचा कमबॅक

कपिल शर्माचा कमबॅक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कॉमेडी किंग’ कपिल शर्मा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीस येत आहे. छोट्या पडद्यापासून दुरावलेला कपिल शर्मा ‘फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा’ या नव्या शोद्वारे कमबॅक करत आहे.

या शोचे स्वरूप कपिलच्या आधीच्या शोपेक्षा अनोखे आणि मज्जेदार असणार आहे कारण यात प्रेक्षकांमधील कुटुंबाला स्टेजवर बोलावून त्यांच्यासोबत गमतीदार खेळ खेळले जाणार आहे. कपिलच्या स्टँड-अप कॉमेडीनं शोची सुरूवात होईल. असे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजले.

या कार्यक्रमातही कपिलचे आधीचे सहकलाकार किकू शारदा, चंदन प्रभाकर त्याच्यासोबत धम्माल करताना दिसतील. सुनिल ग्रोव्हर आणि अली असगर हे या शोचा भाग असणार कि नाही ? हे उत्सुकतेचं आहे. सर्वांच्या पसंतीचा ‘सुपर डान्सर्स’ हा शो संपल्यावर “फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा” हा शो सुरू होइल.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version