कॉमेडी किंग, कपिल शर्माची शानदार व्हॅनिटी व्हॅन

कॉमेडी किंग, कपिल शर्माची शानदार व्हॅनिटी व्हॅन

जय महाराष्ट्र, मुंबई

सर्वांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा सध्या छोट्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘फॅमिली विथ कपिल शर्मा’, या नव्या शोद्वारे कपिल शर्मा पुन्हा छोट्या पडद्यावर येत आहे. नुकताचं कपिलने एक व्हॅनिटी व्हॅन विकत घेतली आहे.

या आरामदायी आणि आकर्षित व्हॅनिटी व्हॅनची डिझाइन दिलीप छाबरिया यांनी केली आहे. याआधी दिलीप यांनी अनेक बॉलीवूड कलाकारांसाठी व्हॅनिटी व्हॅनच्या डिझाईन साकारल्या आहेत. कपिलने सोशल मिडीयाद्वारे आपल्या व्हॅनिटी व्हॅनचे काही फोटो शेअर केले आहेत.

कपिलच्या या शानदार व्हॅनिटी व्हॅनमध्ये, त्याला अनेक प्रकारच्या सुखसोईंचा उपभोग घेता येणार आहे. यात उच्च प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे इतर कलाकारांप्रमाणे आता कपिलच्या व्हॅनिटी व्हॅनची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version