आपचे निलंबित आमदार कपिल मिश्रांवर हल्ला

आपचे निलंबित आमदार कपिल मिश्रांवर हल्ला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

आपचे निलंबित आमदार कपिल मिश्रा यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला आहे.

 

हल्ला करणारा व्यक्ती हा आपचाच कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे.

 

आपला मिळालेल्या परदेशी निधीबाबत माहिती जाहीर करावी. अशा मागणीसाठी कपिल मिश्रा उपोषणाला बसले होते. याआधी मंगळवारी त्यांना अनोळखी क्रमांकारवरून धमकीचे फोन

आल्याचे वृत्त होते.

 

माझा मृत्यू झाला तरी केजरीवालांवर काहीही परिणाम होणार नाही. मात्र, हे प्रकरण देशाच्या चिंतेचा विषय असून मला जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा मिश्रांनी केला.

 

कपिल मिश्रा यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांवर घोटाळ्याचे खळबळजनक आरोप केले होते. केजरीवालांच्या मंत्रीमंडळातील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन

यांनी मुख्यमंत्र्यांना दोन कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट मिश्रा यांनी केला होता आणि हे पैसे देताना मी स्वतः पाहिलं असा आरोप कपिल मिश्रा यांनी केला होता.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version