कॉन्ट्रोवर्सी क्वीन कंगना रानौत पुन्हा वादात अडकली आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर एक मीम शेअर केले होते. त्यामुळे आता तिच्या अडचणीत वाढ झालीये. याबाबत तिने पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने काही दिवसांपूर्वी तिबेटचे अध्यात्मिक गुरू दलाई लामा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशी संबंधित मीम शेअर केले होते. त्यामुळे आता ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने १२ एप्रिल रोजी एक मीम सोशल मीडियावर शेअर केले होते. खरंतर हा मीम तिबेटचे अध्यात्मिक गुरू दलाई लामा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशी संबंधित होता. यात मीम मध्ये दलाई लामा आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना दाखवले होते आणि त्याखाली ‘दलाई लामा यांचे व्हाईट हाऊसमध्ये हार्दिक स्वागत आहे असे लिहिले होते. ही पोस्ट पोस्ट शेअर करत कंगनाने लिहिले की, ‘दोघांनाही एकच आजार आहे, नक्कीच दोघे मित्र असू शकतात.’. तिच्या या पोस्टमुळे ती चांगलीच फसली आहे.
तिची हि पोस्ट पाहून काही लोकांनी तिच्या पाली कार्यालयाबाहेर निदर्शने सुरू केली. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी तिने पुन्हा सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली बाजू मांडली. यात तिला कोणाचेही मन दुखवायचे नव्हते, असे तिने सांगितले.तिच्या स्पष्टीकरणाततिने लिहिले की, ‘बौद्ध लोकांचा एक गट पाली हिल येथील माझ्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत आहे.त्यामुळे मला हे स्पष्ट करायचे आहे की मला कोणाला ही दुखवायचे नव्हते. हा फक्त एक विनोद होता. कृपया गैरसमज करून घेऊ नका.’ या नंतर कंगनाने हात जोडणारे एक इमोजीदेखील शेअर केले आहेत.त्यापुढे ती म्हणाली,’माझी बुद्ध आणि परमपूज्य १४ व्या दलाई लामा यांच्या शिकवणुकीवर पूर्ण श्रद्धा आहे, त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेत घालवले आहे.त्यामुळे माझे कोणाच्याही विरोधात काहीही बोलणे नाही. एवढ्या उन्हात उभे राहू नका. कृपया घरी जा.’असे ती स्पष्टपणे म्हणाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.