कमला मिल कंपाऊंड आग प्रकणात भोईवाडा कोर्टात आरोपपत्र दाखल

कमला मिल कंपाऊंड आग प्रकणात भोईवाडा कोर्टात आरोपपत्र दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कमला मिल कंपाऊंडमधील आग दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज भोईवाडा कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या अग्नीतांडात एकूण १२ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून हे आरोपपत्र २ हजार ७०० पानी असल्याचे सांगण्यात आले.

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजो बिस्ट्रो या रेस्टोपबना २९ डिसेंबरच्या रात्री लागली होती. या भीषण आगीत १४ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. मोजोस बिस्ट्रोमध्ये हुक्क्यामुळे ही आग लागली होती आणि नंतर त्या आगीचा भडका उडाला. पबमध्ये अडकलेल्या लोकांचा त्यात गुदमरून आपला जीव गमावला. वन अबव्ह आणि मोजो बिस्ट्रो हे दोन्ही रेस्टोपब आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे अग्निशमन दलाच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले होते.

आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्यांमध्ये कृपेश सिंघवी, जिगर सिंघवी, युग पाठक, अभिजीत मानकर, रमेश गोवानी, रवी भंडारी, राजेंद्र पाटील, उत्कर्ष विनोद यांचा समावेश आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version