कमला मिलचे मालक रमेश गोवानीला अटक

कमला मिलचे मालक रमेश गोवानीला अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कमला मिलचे मालक रमेश गोवानी यांना अटक करण्यात आली आहे. गोवानी यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमला मिल भागात मोजो बिस्ट्रो आणि वन अबव्ह या दोन रेस्टॉरेंट्सना आग लागली.

या दोन्ही रेस्टॉरेंट्सना युग तुली, युग पाठक, जिगर संघवी, कृपेश संघवी आणि अभिजित मानकर या पाचही मालकांना याआधीच अटक करण्यात आली. आता रमेश गोवानी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

29 डिसेंबर रोजी कमला मिलजवळील पबला आग लागली होती. या भीषण आगीत होरपळून 15 निष्पापांचे बळी गेले. संबंधित प्रकरणी दोषींना अटक करण्यात आली असून आता कमला मिलचे मालक रमेश गोवानीला अटक करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version