जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 15 जणांचा मृत्यू झालाय. तर, अनेकजण जखमी झालेत. इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोजोस बिस्ट्रो पबमध्ये भीषण असं अग्नितांडव घडलंय.
या अग्नितांडवात मृत पावलेल्यांमध्ये खुशबू मेहता या 28 वर्षीय विवाहितेचा समावेश आहे. खुशबू आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुवारी पबमध्ये आली होती. अन् तिची ही बर्थ डे पार्टी शेवटची ठरली.
खुशबूचा हा वाढदिवस अखेरचा ठरणार आहे, याची साधी कल्पनादेखील कुणी केली नव्हती. खुशबूच्या जाण्यानं मेहता कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.