कमला मिल अग्नितांडवा प्रकरणी आणखी तिघांना अटक

कमला मिल अग्नितांडवा प्रकरणी आणखी तिघांना अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कमला मिल आगीप्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कमला मिलचा संचालक भंडारी, हुक्का कंपनी निर्वाणाचा मालक पांडे आणि फायर ब्रिगेड अधिकारी पाटील यांचा समावेश आहे. एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, कमला मिलमधील आग ही मोजो बिस्त्रोतील हुक्का पार्लरमुळेच लागल्याचा अहवाल मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आणखी काही जणांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

मोजो बिस्त्रोतील हुक्का पार्लर विनापरवाना गच्चीवर थाटण्यात आलं होतं. त्या जागेचे आणि रेस्टॉरन्ट मालक या आगीला जबाबदार असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. गुरुवार 29 डिसेंबरच्या मध्यरात्री ही भीषण आग लागली होती. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version