कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय गरबा

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय गरबा

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

नवरात्रोत्सव अगदी तोंडावर आला आहे. नवरात्रोत्सवात आणखी एक आकर्षण म्हणजे दांडिया रास आणि गरबा.

 

पण, कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्येच गरबा रंगताना दिसत आहे. डोंबिवलीत यंदा रासरंग या गरब्याचं आयोजन करण्यात आले.

 

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा गरबा पार पडणार आहे. तर, दुसरीकडे राज्यमंत्री आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नमो रमो नवरात्री हा भव्य दांडिया कार्यक्रम पार पडणार आहे.

 

राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीच ही स्पर्धा सुरु असल्याचा आरोप केला जात आहे. आता तरुणाई कोणत्या कार्यक्रमाला गर्दी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version