जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर दादरसारख्या मुंबईतील गर्दीच्या स्टेशनांवर वेगाने पर्यायी पादचारी पूल लष्करांकडून बांधण्याचे काम पूर्ण करण्यात आलंय. अनेक वर्षांपासून या स्थानकामध्ये पादचारी पूल नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. त्यासाठी प्रवासी तसेच प्रवासी संघटना यांच्या कडून सतत पूल बांधण्यासाठी रेल्वेकडे मागणी होत होती..मात्र प्रत्यक्षात हा पूल उभारल्यावर प्रवाशांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकात आज कसाऱ्याच्या दिशेनं पादचारी पुलाच गर्डर चढविण्याच काम सकाळी 10 वाजता सुरू झालं. 3 वाजेपर्यंत चा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, 2 तासातच मुख्य काम लष्कर अधिकारी आणि जवानांनी पूर्ण केल आहे.
अवघ्या 9 मिनिटांत गर्डर चढवण्याची कामगिरी या लष्करी अधिकारी आणि जवानांनी पार पाडली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.