कल्याणमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण

कल्याणमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कल्याणच्या नेवाळीमध्ये जमिन संपादनावरुन आंदोलन पेटलं. या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्याही जाळल्या. तसंच टायर जाळून कल्याण-मलंगगड रस्ता रोखून धरला.

 

नेवाळीमध्ये विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी जबरदस्तीनं जमीन संपादीत केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतजमीनीवर जेव्हा पेरणी करायला गेले तेव्हा रोखण्यात आल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला.

 

त्यामुळेच शेतकऱ्यांचा भडका उडाला. नेवाळी नाका परिसरात शेतकऱ्यांनी टायर तसंच गाड्या जाळून आंदोलन केलं. या आंदोलनात पोलीस अधिकारी तसंच कर्मचारीही जखमी झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version