जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण
केडीएमसीत आयुक्त केवळ भाजप नगरसेवकांची कामे करतात आणि सेनेच्या नगरसेवकांच्या फाईल दाबून ठेवत असल्याचा आरोप सेनेच्या नगसेवकांनी केला.
या दुजाभावाविरोधात सेना नगरसेवक आणि नगरसेविका संतप्त झाले आहेत. केडीएमसीत सत्ताधारी शिवसेनेनं आयुक्त पी वेलारासु यांच्या विरोधात आंदोलन
केले.
शिवसेना नगरसेवकांनी आयुक्त दालनात घोषणाबाजी केली. केवळं इथंपर्यंतचं सेना नगसेवक थांबले नाहीत तर त्यांनी खुर्च्यांची तोडफोड देखील केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.