Jui Gadkari: ‘आतातरी पंडीताबरोबर शांत.. सुखी राहा’; पूर्णा आजींच्या जाण्याने जुई भावूक

ज्योती चांदेकर यांच्या अचानक निधनामुळे ठरलं तर मग मालिकेतील ऑनस्क्रीन आजीची भूमिका अपूर्ण राहिली; जुई गडकरी भावनिक पोस्टद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.<br/>
Jui Gadkari: ‘आतातरी पंडीताबरोबर शांत.. सुखी राहा’; पूर्णा आजींच्या जाण्याने जुई भावूक

Jui Gadkari: ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मनोरंजनविश्व दुःखात आहे. त्यांनी अखेरपर्यंत स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेत काम केले. तब्येतीच्या अनेक समस्या असूनही त्या कामासाठी नेहमीच तयार होत्या. शूटिंग दरम्यान पाच दिवसांची सुट्टी घेतली होती, मात्र परत येण्याआधीच त्यांनी अचानक प्राण गमावले. मालिकेत त्यांचा साकारलेला पूर्णा आजीची व्यक्तिरेखा अपूर्ण राहिली, ज्यामुळे प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे.

सह-कलाकारांमध्ये एकत्र काम करत छान घरोबा तयार होता; ज्योती चांदेकर या त्या परिवारातील ज्येष्ठ अभिनेत्री होत्या. अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर त्यांच्या गमतीजमती शेअर करत त्यांना प्रेमाने ‘म्हातारी’ असे संबोधायची. ऑनस्क्रीन सासू-नातसून नातं असलं तरी ऑफस्क्रीन जुई आणि ज्योती यांच्यात घट्ट नातं होतं. ज्योती चांदेकर यांच्या अंत्ययात्रेला जुई ओक्साबोक्शी रडताना दिसली. त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिने आपलं मन मोकळ केलं. 

हेही वाचा: Jyoti Chandekar: आईला निरोप देताना तेजस्विनीला अश्रू अनावर; ज्योती चांदेकर अनंतात विलीन

जुईने फेसबुक पोस्ट मध्ये नेमकं काय लिहिलं? 

तशी तिची आणि माझी पहिली भेट २०१० साली बाजीराव मस्तानी या मालिकेच्या सेटवर झाली.. आम्ही एकाच मेकपरुम मध्ये बसायचो.. तिची काम करण्याची पद्धत बघुन मी हुरळुन गेले होते.. आळवणात ही कोण ईतकं सुंदर कसं दिसु शकतं असा प्रश्न पडायचा.. 
      
 मग २०२२ साली ठरलं तर मग ला पुन्हा आम्ही भेटलो… 
आधी आहो ज्योती ताई, मग अगं ज्योती ताई, मग पुर्णाआजी, मग फक्त आजी आणि नंतर “माझी म्हातारी” अशी आमची मैत्री वाढली होती… म्हातारीला सगळ्याची आवड!! माझ्या वयाच्या मुलींनाही लाजवेल अशी छान नट्टापट्टा करायची… छान साड्या, दागीने खास स्वतःचे, नव नवीन कॅासमेटीक्स, जेल पॅालीश ई अशा सगळ्याची तीला खुप आवड!! 
        
 मला मुळात आजी आजोबा खुप आवडतात.. माझी आजी २०१५ साली गेली.. पण ता नंतर मला माझ्या म्हातारीत माझी आजी पुन्हा भेटली… तशीच गोड गुबगुबीत.. तीच्या स्पर्षाची एक वेगळी ऊब होती आणि म्हणुन मी सतत तिच्या अंगा अंगाशी करायचे… तिच्या मांडीत बसायचे.. अंगावर रेलुन झोपायचे… तिचे हात धरायचे.. तिला लाडाने माझी नखं लावायचे.. त्यावर ती प्रेमाने मला “आलं माझं मांजराचं पिल्लु” असं म्हणायची… ४-४.३० झाले कि तिचा खाऊचा पिटारा ऊघडायची… त्यात काय काय असेल ते सगळ्यांना द्यायची..बरेचदा त्यात चिप्स, चकल्या, शेव ई असायचं.. त्यावरुन माझा रोज ओरडा खायची… गोड माझ्यापासुन लपवुन खायची आणि पकडलीच जायची.. कित्येकदा मी तिच्या तोडातुन भजी, गुलाबजाम बाहेर काढलेत.. पण म्हातारी ऐकायची नाहीच… पुण्यावरुन येताना आवर्जुन सगळ्यांसाठी क्रीमरोल आणायची! एकदा मी तिला जरा जास्तं ओरडले.. जेजे करायचं नाही तेच के करतेस असं खुप बोलले… त्यावर मला म्हणाली “मला पंडीतांकडे जायचंय”… आणि मी सुन्न पडले… त्यापुढे मी ना तिला ओरडु शकले ना काही बोलु शकले… कोणाच्या आयुष्यात कसा कुठल्या बाबतीत एकटेपणा असु शकेल काही सांगता येत नाही.. जेवायला आवर्जुन माझ्या शेजारी बसायची.. मग माझ्या डब्यातलं काय असेल ते आवडीने खायची.. “जुया फदफदं आण ना” असं म्हाणाली होती आणि मी ते करुन नेल्यावर खासच खुश झाली होती!! तिच्या घरातल्या तिच्या केअरटेकर मावशी तिला रोज डबा द्यायचा! बरं, त्या हिच्यापेक्षा बऱ्याच तरुण तरी त्यांना ही “म्हातारी” म्हणायची!! माझ्याकडचं पेन रीलीफ ॲाईल बरेचदा विकत घ्यायची… पाय सतत सुजलेले असायचे तिचे.. हट्टी होती कधी सेटवर कोणी ओरडलंच तर रडायची ही अगदी लहान मुलासारखी… पण माझी म्हातारी काम काय सुंदर करायची! डायलॅागचं प्रॅांमटींग घेतलं तरी त्यात “जान” भरुन ते डीलीव्हर करायची… कधी करारी तर कधी प्रेमळ असे पटकन तिचे डोळे बदलायचे! तिच्याबरोबर मी खुप सीन केले ज्यात आमचं पर्सनल नातं तयार झालं.. तिच्यात मला माझी आजी दिसायची.. तिचे पाय चेपुन देणाचे सीन तिला भरवण्याचे सीन मी मनापासुन एन्जॅाय करायचे.. माझा पहिला ॲानसक्रीन पापी घेण्याचा सीन मी तिच्या बरोबरच केला! आणि मग तिच्या सतत पाप्या घेणं, तिला मीठी मारणं हे सीन मध्ये आपसुक व्हायचं… तिच्याबरोबरचे सीन करायला कधी ग्लीसरीन नाही घ्यावं लागलं.. मी तिची खुप चेष्टा करायचे पण तिचा मोठेपणा कि तिनी ते मनाला कधीच लाऊन घेतलं नाही… मला तिच्या काठीने फटके द्यायची पण रागावली कधीच नाही.. बरेचदा आजारी असायची.. त्यावर आम्ही तिला म्हणायचो असं म्हण मी बरीए.. मग बरी होशील.. बरेचदा सेटवरुन हॅास्पीटलला नेलं तिला.. पण ती परत यायची.. परत सुंदर दिसायची… मस्ती करायची… याही वेळेला वाटलं होतं तु परत येशील… पुढच्या १० दिवसात आपण ९०० भाग पुर्ण करतोय गं.. अजुन कितीतरी काम करायचं बाकी होतं.. तुझयाकडुन अजुन खुप शिकायचं होतं… तुझ्या व्यातीरीक्त “पुर्णाआजी” म्हणुन दुसर्या कोणाला मी कशी एक्सेप्ट करु?? तुझी औषधाच्या वासांनी भरलेली खोली.. तुझा रेलीस्रपे चा परफ्युम! हे सगळं आता परत कधीच दिसणार नाही… आजही तुझ्या दागीन्यांनी भरलेले तुझ्या रुमचे ड्रॅाव्हर तसेच लॅाक आहेत आणि कदाचीत तसेच राहतील… तुला माझं लग्नं झालेलं बघायचं होतं.. मला म्हणायचीस मा ठणठणीत बरी होऊन येणार तुझ्या लग्नाला… सगळं राहुन गेलं गं.. आपल्या मोनिकाच्या वृंदाला तुझा सहवास लाभला.. आशीर्वाद मिळाला हीच मोठी गोष्टं! अगदी परवा म्हणालीस ना गं मी येते पुण्याला जाऊन… 
          
आज तिला स्मशानात असं शांत झोपलेलं बघुन खुप त्रास झाला..एका क्षणात सगळं शांत झालं होतं… कधी कधी रक्ताची नसली तरी अशी नाती असतात जी खुप आनंदही देतात आणि त्रास ही… आजी तुझी ऊणीव कायम भासत राहील… तु परत येते सांगुन परत आलीच नाहीस… 
आतातरी पंडीताबरोबर शांत.. सुखी राहा 

या दुखद घटनेमुळे फक्त मालिकेतील कुटुंबच नाही तर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. जुई गडकरीसह सर्व सह-कलाकार त्यांच्या आठवणींमध्ये ज्योती चांदेकर यांचे कौतुक करत राहणार आहेत आणि त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version