जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पॉपस्टार जस्टिन बिबर मुंबईत दाखल झाला आहे. चार्टर्ड प्लेननं रात्री कलिना विमानतळावर तो उतरला.
विमानतळावर बिबरची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते उपस्थित होते. विमानतळावरून तो थेट लोअर परेलच्या हॉटेलमध्ये गेला.
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये जस्टिन बिबरचा म्युझिकल कॉन्सर्ट होणार आहे. त्यासाठी देशभरातून बिबरचे चाहते मुंबईत येणार आहेत. कार्यक्रमासाठी दुपारपासून चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.