कार्तिकचे नवे घर एकदा पहाच !

कार्तिकचे नवे घर एकदा पहाच !

मुंबई, ९ जुलै २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन हा नेहमी चर्चेत असतो. कार्तिकच्या चित्रपटांसह त्याच्या हटकेचे अंदाजाचे देखील लाखो चाहते आहेत. कार्तिकने आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान आता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच विशेष कारण म्हणजे कार्तिकने मुंबईत नावंगीण घर खरेदी केले आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनने मुंबईत जुहू येथे नवीन घर खरेदी केलंय. कार्तिकच्या नवीन घराच्या पुजेचे काही फोटो सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहेत. कार्तिकने जुहूत1,594 स्क्वेअर फूटचा अपार्टमेंट खरेदी केला असून याची किंमत 17.50 कोटी रुपये इतकी आहे. कार्तिकचे घर सिद्धीविनायक बिल्डिंगमध्ये आहे. याच परिसरात ‘प्रेसिडेन्सी सोसायटी’ येथे कार्तिक आर्यनचे दुसरे घर आहे. या घरात कार्तिकचे कुटुंब राहते.

गेल्या वर्षांपासून तो नवीन घराच्या शोधात होता. यापूर्वी त्याने जुहू तारा रोड येथील प्रनेता अपार्टमेंटमध्ये अभिनेता शाहिद कपूरकडून एक घर भाड्याने घेतले होते. त्यानंतर आता कार्तिकने स्वबळावर स्वतःसाठी आणि आई -वडिलांसाठी घर खरेदी केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version