शिवसेनेच्या जुन्नरमधील जिल्हा परिषदेच्या सदस्याला खंडणी प्रकरणी अटक

शिवसेनेच्या जुन्नरमधील जिल्हा परिषदेच्या सदस्याला खंडणी प्रकरणी अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतील विकास काकडेकडून 20 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पुण्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील सदस्य गुलाब विठ्ठल पारखेयांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे.

मुंबईतील पवई भागात असलेल्या एका नामांकित इसम विकास काकडेकडून 20 कोटींची खंडणी मागण्यात आली होती. अनेकदा वाटाघाटी करुन 20 कोटींचा आखडा 6 कोटी इतका ठरवण्यात आला. त्यापैकी दोन कोटी रुपयांची रक्कम स्वीकारताना खंडणीखोराला पवई पोलिसांनी अटक केली.

आरोपी गुलाब विठ्ठल पारखे हे शिवसेनेकडून जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. संबंधित विकासकाकडे ते लायसनिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. पवई पोलिसांनी कलम 384 अन्वये पारखेंवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version