शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास गेला; जुन्नरमध्ये आगीत 6 एकर ऊस जळून खाक

शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास गेला; जुन्नरमध्ये आगीत 6 एकर ऊस जळून खाक

जय महाराष्ट्र न्यूज, जुन्नर

जुन्नर तालुक्यातल्या आनंदवाडीमध्ये ऊसाच्या शेताला भीषण आग लागलीय. या आगीमध्ये 2 शेतकऱ्यांच्या शेतातल्या 6 एकर ऊस आगीत जळून खाक झालाय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय.

शेतात लागलेल्या आगीमुळे नारायणगाव शहरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसून येत होते. हाता-तोंडाशी आलेला घास गेल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. आगीत लाखो रुपयांचं पीक जळून खाक झालयं.

कधी बर्फवृष्टीने तर कधी दुष्काळाने शेतीचे नुकसान होत आहे. दिवस रात्र एक करूण त 6 एकर शेतात ऊस पेरला होता. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागली आणि सगळा ऊस जळून खाक झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version