गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी नवीन कुमारला बंगळूरमधून अटक

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी नवीन कुमारला बंगळूरमधून अटक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी नवीन कुमारला अटक करण्यात कर्नाटक पोलीस विशेष पथक (एसआयटी)ला यश आले आहे. नवीन कुमारने गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांना आश्रय देण्यासोबत हत्या करण्यासाठी सराव शिबिरासाठीची व्यवस्था केली असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी नवीन कुमारला सत्र न्यायालयाकडून आठ दिवसांची कोठडी सुनावली आहे. नवीन कुमार हा मांड्या जिल्ह्यातील मद्दूर येथे राहणारा असून पाच महिन्यानंतर विशेष पथकाला यश मिळाले.

माहिती मिळताच एका आठवड्यात बेंगळुरमधून परिवहन महामंडळाच्या बस स्टॅण्डजवळून ताब्यात घेतले होते. एक ३२ कॅलिबर बंदूक आणि १५ जिवंत काडतूसे त्याच्याकडून जप्त करूण्यात आली आहेत. एम.एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्यादेखील गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येआधी त्यांच्या घराबाहेर काही आज्ञात लोक त्यांच्या घराचे निरीक्षण करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील कर्नाटक पोलीस विशेष पथकाला मिळाले आहेत. सीसीटीव्ही फुटेज शिवाय काही अन्य पुरावे पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version