गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली

गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली

वृत्तसंस्था, बंगळूर

 

जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची बंगळूरमध्ये राहत्या घरात घूसून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेला एक महिना उलटूनही मारेकऱ्यांचा थांगपत्ता लागला नव्हता.

 

मात्र, आता मारेकऱ्यांची ओळख पटली असल्याचा खुलासा कर्नाटक राज्याचे गृहमंत्री रामालिंगा रेड्डी यांनी केला आहे. या संदर्भात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून सध्या मारेकऱ्यांची ओळख जाहीर करता येणार नाही असे स्पष्टीकरणही गृहमंत्र्यांनी दिले.

 

पुरावे गोळा करण्याचे काम पूर्ण होताच मारेकऱ्यांना अटक केली जाईल असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तपासणी दरम्यान पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फूटेज लागले आहे. त्यावरुन पोलीस पुढील तपास घेत आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version