जय महाराष्ट्र न्यूज हेडलाईन्स @ 2.00 PM
- नितीन आगे हत्येप्रकरणी पुन्हा नव्यानं चालणार खटला… नवी साक्ष, पुरावे सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश
- देवा’ला थिएटर न मिळाल्यास शुटींग बंद पाडू, मनसेचा इशारा… मनसेची धमकी खपवणार नाही, संजय निरुपम यांची भूमिका
- मराठी पाट्यांसाठी रायगडमध्ये मनसेचं आंदोलन… घोषणाबाजी करत इंग्रजी पाट्यांवर शाईफेक
- कोकणात रिफायनरी प्रकल्पासाठी सेनेनं आग्रह केल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा… शिवसेना खासदारांविरोधात षडयंत्र, विनायक राऊत, अनंत गितेंचा आरोप
- संघ मुख्यालयातील भाजप आमदारांच्या कार्यशाळेत आशिष देशमुख, खडसेंची दांडी… दांडी मारून अजित पवारांसोबत देशमुखांची विधानसभेत एंट्री
- गुजरात निकालानंतर महाराष्ट्रात मराठा युवा क्रांती मोर्चातर्फे भाजपाला इशारा… हुकलेले शतक हा इशारा या आशयाचे झळकले पोस्टर्स
- चालकाविना ट्रकनं घेतल्या गिरक्या… नियंत्रण मिळवेपर्यंत चालकाच्या नाकीनऊ… सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
- वसईतील मायलेकीच्या जीवावर बेतला रेल्वे रूळांवरील शॉर्टकर्ट… सिग्नलवरून सुटलेल्या एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू
- आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार दुकानं… राज्य सरकारनं दिली मुभा… कामगारांना साप्ताहिक सुट्टी देणं मात्र बंधनकारक
- पुण्याच्या भूगावमध्ये 61वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा…आजपासून 24 डिसेंबरपर्यंत लाल मातीत रंगणार दंगल