#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 7.00 AM
#हेडलाइन मराठा क्रांती मोर्चाच्या कालच्या हिंसक आंदोलनानंतर चाकणमध्ये आज शांतता, कडक पोलीस बंदोबस्त
#हेडलाइन मराठा आरक्षणासाठी कुणीही हिंसा करु नका, मराठा समन्वय समितीचं आंदोलनकर्त्यांना आवाहन
#हेडलाइन काहीही करा पण मराठा समाजाला आरक्षण द्या, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट पाहू नका, उद्धव ठाकरेंचा सल्ला
#हेडलाइनमराठा आरक्षणानंतर आता धनगर समाजही आक्रमक, आरक्षणासाठी 1 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा धनगर समाजाचा इशारा
#हेडलाइन एक ऑगस्टपासून सिडकोचे सर्व व्यवहार ऑनलाईन होणार, आर्थिक व्यवहाराची घडी बसवण्यासाठी सिडकोचं महत्त्वाचं पाऊल
#हेडलाइन मुंबईच्या समुद्र किना-यांवर कचरा परत येतोच कसा?, हायकोर्टानं सुनावलं पर्यावरणाशी संबंधित समस्यांकडे आता गांभीर्यानं पाहा, मुंबई उच्च न्यायालयाने खडसावलं
#हेडलाइन कुरियवाला असल्याचा बनाव करून लुटणारे चोरटे जेरबंद, 70 वर्षीय महिलेचे हात-पाय बांधून साडेतीन साखांचा मुद्देमाल जप्तस, मीरा रोडमधील धक्कादायक घटना
#हेडलाइन जुहू आणि गिरगाव समुद्र किनाऱ्यांवर आढळले विषारी ब्ल्यू बॉटल जेलीफिश, दंश करणाऱ्या जेलीफिशपासून नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश
#हेडलाइन राजधानी एक्स्प्रेसारखा धावणारा वसईतला धावपटू भरत घरत अद्यापही बेरोजगार, ठाणे मॅरेथॉनवेळी भरतच्या पायाला दुखापत, नोकरीचं आश्वासनं पाळण्यात सरकार अपयशी
#हेडलाइनअंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईच्या सर्व गणेश मंदिरे फुलं आणि विद्युत रोषणाईनं सजली, तर अनेक सार्वजनिक मंडळात मंगळवारी पाद्यपूजनाचा सोहळा
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.