#हेडलाइन्स @7.00am 170718

#हेडलाइन्स @7.00am 170718

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @7.00 AM

#हेडलाइन दूध आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस, पुण्यात पोलीस बंदोबस्तातील दुधाची गाडी फोडली तर सरकार आणि आंदोलनकांमध्ये अजूनही चर्चा नाही
#हेडलाइन दूध आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत दूध पुरवठा सुरळीत पण आज गाड्या न आल्यास उद्या मुंबईत दुधाची कमतरता न भासण्याची शक्यता
#हेडलाइन खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक, थेट मंत्रालायासमोरच्या रस्त्यावरच खणले खड्डे, 4 मनसैनिकांना अटक
#हेडलाइन माळशेज घाटात पुन्हा कोसळली दरड, मोठ्या वाहनांना घाटातुन प्रवेश बंद, फक्त लहान वाहनांसाठी एकेरी वाहतुक सुरु, घाटरस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु
#हेडलाइन नवी मुंबईतल्या तळोजात घोट नदीमध्ये कार कोसळली, कारमधील 4 जणांना स्थानिकांच्या मदतीनं वाचवण्यात यश
#हेडलाइन गुजरातमध्ये पावसामुळे पुराचं थैमान, अमरेलीत पुरात अडकलेल्या बसमधील 45 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश
#हेडलाइन बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना न मिळाल्यानं विरोधी पक्षनेत्यांचा सभागृहातच ठिय़्या, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
#हेडलाइन गोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारु प्यायल्यास दंड, लवकरच अंमलबजावणीची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची घोषणा
#हेडलाइन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरींचं नाव, अधिवेशनात विधेयक एकमतानं मंजूर
#हेडलाइन तुकोबांच्या पालखीचं इंदापूरहून तर माऊलींच्या पालखीचं बरडहून प्रस्थान, माऊलींची पालखी आज सोलापूर जिल्ह्यात करणार प्रवेश

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version