#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM
#हेडलाइन एल्गार परिषदप्रकरणी ताब्यात घेतलेल्या 5 जणांना आज कोर्टात हजर केलं जाणार तर कारवाईचा राहुल गांधींकडून निषेध
#हेडलाइन नालासोपारा अवैध शस्त्र साठा प्रकरणी अटेकत असलेल्या शरद कळसकरचा ताबा आज CBI घेण्याची शक्यता, न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष
#हेडलाइन भाजपविरोधी आघाडीआधीच पंतप्रधान पदावरुन मतभेद, राहुल गांधी पंतप्रधान व्हावे ही काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं मल्लिकार्जुन खर्गेचं पवारांना उत्तर
#हेडलाइन पुण्यातील एमआयटी महाविद्यालयामधल्या 150 विद्यार्थ्यांना कँटीनमधल्या जेवणातून विषबाधा, लोणी काळभोरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु
#हेडलाइन रायगडमध्ये राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेत्या तरुणीची आत्महत्या, आर्थिक परिस्थितीला कंटाळून वैभवी पाटेकरने संपवलं जीवन
#हेडलाइन मीरा-रोडमध्ये 4 मजली इमारात पालिकेने केली रिकामी, इमारत रिकामी करण्याचा पालिकेचा निर्णय, इमारतीत 70 कुटुंबियांचं वास्तव्य
#हेडलाइन वाहतुकीला अडथळा नको म्हणून ठाण्यात रात्रभर खड्डे बुजवण्याची मोहीम तर गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे बुजवण्याचं एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
#हेडलाइन आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं पदकांचं अर्धशतक तर हॉकीमध्ये श्रीलंकेचा 20-0 नं उडवला धुव्वा
#हेडलाइन गणेशोत्सवावर महागाईचं सावट, गणेशमूर्तींच्या किमतीत 10 ते 15 टक्क्यांची वाढ
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.