शरद पवार आणि सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणा-याला अटक; जितेंद्र आव्हाडांनी केली होती तक्रार

शरद पवार आणि सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणा-याला अटक; जितेंद्र आव्हाडांनी केली होती तक्रार

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या वालचंद गिट्टे या व्यक्तीला आज नागपूर पोलिसांनी अटक केलीये.

16 नोव्हेंबर रोजी वालचंद गिट्टे याने थेट शरद पवारांवर आक्षेपार्ह ट्वीट केला होता. इतकंच नाही तर खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही अश्लील टिप्पणी केली होती.

त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी सुरुवातीला ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर वालचंद गिट्टे याला नागपूरमध्ये अटक करण्यात आली असून नंदनवन पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version