वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जिओ फोनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. रिलायन्सचा जिओ फोन आज लाँच झाला असला तरी प्रत्यक्षात फोन हातात यायला ग्राहकांना आणखी महिनाभर वाट पहावी लागणार आहे.
24 ऑगस्टपासून या फोनसाठी बुकिंग सुरु होणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ग्राहाकांना या फोनची डिलीव्हरी मिळणार आहे.
सध्या जिओच्या कर्मचाऱ्यांकडून या फोनची बीटा टेस्टिंग केली जाणार आहे. यानंतरच हा फोन ग्राहकांच्या हातात येणार आहे. सॉफ्टवेअर
आणि हार्डवेअर चाचणीसाठी हा फोन आधी जिओच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे समजते.
रिलायन्स जिओ फोनचे बेस्ट फिचर्स
– यामध्ये काही मल्टीमीडिया अॅप्स असणार
– 4 G VoLTE कॉलिंग
– केबलद्वारे टीव्हीला फोन जोडण्यासाठी टेलीव्हिजन सेटही मिळणार
– ग्राहकांना हा फोन घेतल्यानंतर 153 रुपयांमध्ये 28 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा मिळणार आहे
– हो फोन टीव्हीला जोडता यावा, यासाठी ‘जिओ फोन टीव्ही केबल’ दिली जाणार
– हा फोन टीव्हीला जोडण्यासाठी 309 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल.
– सिंगल सिम स्लॉट
– 2.4 इंच आकाराची स्क्रीन, टॉर्चलाईट, एफएम
– 22 भारतीय भाषांमध्ये व्हॉईस कमांड
असा खरेदी करा जिओचा फोन
– जिओ फोनची बुकिंग करण्यासाठी अधिकृत जिओ फोन विक्रेत्याकडे आधार कार्डची एक झेरॉक्स द्यावी लागेल.
– एक व्यक्ती एका आधार कार्डवर देशात एकच फोन खरेदी करु शकतो.
– आधार कार्ड दिल्यानंतर नोंदणी होईल, त्यानंतर टोकण नंबर देण्यात येईल. हा टोकण नंबर फोन घेताना उपयोगी येईल.
– जिओ फोन हा शून्य रुपये किंमतीमध्ये असेल, मात्र अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये द्यावे लागतील
– हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील.
– जिओ फोनची आत्ता बुकिंग केल्यास डिलीव्हरी 1 ते 4 सप्टेंबर या काळात डिलीव्हरी मिळणार.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.