वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गुजरातमधील वडगाम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवाणी हे विजयी झाले आहेत. दलित हक्क कार्यकर्ते मेवाणी यांनी 18 हजार 150 मतांनी विजय मिळवलाय.
वडगाम मतदारसंघात मेवाणी यांच्यासह एकूण दहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र, खरी लढत मेवाणी आणि भाजपचे चक्रवर्ती यांच्यातच होती.
मेवाणींना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. मेहसाणा जिल्ह्यात मेवाणी यांनी ‘आजादी कुच आंदोलन’ केलंय. उना गावात गोरक्षकांनी दलितांवर हल्ला केल्यानंतर मेवाणी यांच्या नेतृत्वाखाली दलित अस्मिता यात्रा काढण्यात आली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.