संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना मारहाण

संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना मारहाण

बसमधील वादात मध्यस्थी केल्याने बसमधल्या युवकांनी हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्यावर जेठानंद राजपूत यांना खाली उतरवीत त्यांना मारहाण केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्धा जिल्हा संघचालक आहे. या घटनेनंतर हिंगणघाट शहरात रविवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी पोलीस होण्याला घेराव घालत आरोपीवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.

जेठानंद राजपूत हे वर्ध्यावरून बसने हिंगणघाट कडे प्रवास करत होते. बसमध्ये एका दम्पत्याचा वाद सुरु असताना जेठानंद राजपूत हे मध्यस्ती गेले असता वादातील संबंधित युवकांने वाद घातला. सोबतच त्याच्या मित्रांना हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्यावर बोलावत नांदगाव येथे बस थांबवून जेठानंद राजपूत यांना बसखाली उतरवून ८ ते १० जणांनी मारहाण केलीय. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पोलीस ठाण्यावर धाव घेतली.पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेत आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. हिंगणघाट शहरात पोलिसांची कुमक बोलवत वातावरण शांत करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version