जयश्री थोरात काँग्रेसच्याच उमेदवार असतील – थोरात

जयश्री थोरात काँग्रेसच्याच उमेदवार असतील – थोरात

‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची मुलगी जयश्री थोरात यांच्या राजकीय वाटचालीबद्दल भाष्य केलं आहे. जयश्री थोरात यांनी राजकारणात पदार्पण केले असता, त्या काँग्रेसच्याच उमेदवार असतील, असं वक्तव्य थोरात यांनी केलं आहे. त्यामुळे थोरात यांनी जयश्री यांच्या भाजप पर्दापणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

कोण आहेत जयश्री जाधव?

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या.
  • डॉ. जयश्री थोरात या कॅन्सर तज्ज्ञ असून टाटा मेमोरियल रुग्णालयात कार्यरत आहेत.
  • कोरोना संकटकाळात त्यांनी रुग्णांची सेवा केली आहे.
  • जयश्री थोरात यांनी एकविरा फाऊंडेशनची स्थापना केली.
  • संगमनेरमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य तपासणी, दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबवतात.
  • महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
  • महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.
  • वंचित आणि दुर्बल घटकांना विविध साहित्यांचे वाटप करतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version