जयाप्रदा यांच समाजवादी पक्ष नेते आझम खान यांविषयीच खळबळजणक वक्तव्य

जयाप्रदा यांच समाजवादी पक्ष नेते आझम खान यांविषयीच खळबळजणक वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

‘पद्मावत’ चित्रपट पाहताना अल्लाऊद्दीन खिलजीचं पात्र पाहून मला आझम खान यांची आठवण आली, असं वक्तव्य माजी खासदार आणि प्रख्यात अभिनेत्री जयाप्रदा यांनी केलं आहे. आझम खान हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत.

‘निवडणुकीच्या वेळी आझम खान यांनी मला खूप त्रास दिला होता. त्यामुळे खिलजीच पात्र पाहिल्यानंतर माला आझम खानची आठवण आली’, असं जयाप्रदा यांनी म्हटलं. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून जयाप्रदा यांनी निवडणूक लढवली होती.

निवडणुकीत दरम्यान आझम खान यांनी उद्धट वर्तन आणि लबाडी केल्याचा आरोपही जयाप्रदा यांनी केला. आझम खान यांनी 2009 मध्ये आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी अश्लील फोटोंचं वाटप केल्याचा दावाही त्यांनी केला. जयाप्रदांनी आझम खान यांचा उद्धटपणा जिरवण्याची शपथ 2009 मध्ये घेतली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version