म्हैसाळ योजनेचं पाणी दुष्काळी भागाला देण्यास भाग पाडू; जयंत पाटील यांचा इशारा

म्हैसाळ योजनेचं पाणी दुष्काळी भागाला देण्यास भाग पाडू; जयंत पाटील यांचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

म्हैसाळ योजनेतील पाणी दुष्काळी भागाला दिल्यास पाणी टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात कमी होइल असं मत राष्ट्रवादीचे गटनेते आणि आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त

केले.

 

प्रसंगी सरकारवर दबाव टाकून म्हैसाळ योजनेचे पाणी दुष्काळी भागाला देण्यास भागपाडू असा इशारा त्यांनी दिला. म्हैसाळ योजनेतील पाण्याने तलाव भरल्यास

टँकरसाठी होणारा खर्चही टळेल आणि सरकारचे पैसेही वाचतील असंही ते म्हणाले.

 

सध्या सरकारची धोरणं आणि जनहिताची कामं मंदगतीने सुरु आहेत. म्हैसाळ योजनेचं पाणी सध्या बंद आहे.

 

मात्र, प्रत्यक्षात योजनेला नव्याने समाविष्ठ करून सरकार फक्त दिशाभूल करत आहे. त्यामुळे सरकारविरोधात अंदोलन करून संघर्ष करून जनतेला न्याय देण्यासाठी

प्रयत्न करावा आशा सूचना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. जतयेथील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version