महाराष्ट्राचे लक्ष विचलित करण्यासाठी अजितदादांबद्दल बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप

महाराष्ट्राचे लक्ष विचलित करण्यासाठी अजितदादांबद्दल बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात शेतकरी संपावर आहे. त्यामुळे शेतकरी संपावरुन महाराष्ट्राचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडून मुद्दाम अजितदादांबद्दल बातम्या पेरल्या जात असल्याचा

आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.

 

सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली. कारण अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबीकडून घोटळ्याशी

संबंधित सर्व कागदपत्रं मागवली आहेत.

 

विशेष म्हणजे, याप्रकरणी अजित पवारांच्या चौकशीची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित

पवार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती.

 

अजित पवारांचा यामध्ये भूमिका काय आहेत, हे तपासण्यासाठी लाचलुचपत विभागाकडून ईडीनं कागदपत्रं मागवली आहेत. आता याप्रकरणी अंमलबजाबणी

संचालयनालयानं एसीबीकडे घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रं मागवली असून, अजित पवारांची चौकशी होण्याचे संकेत मिळत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version