जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये जातपंचायतीच्या जाचामुळे मायलेकाच्या मृतदेहावर दुसऱ्या जातीतील लोकांनी अंत्यसंस्कार केले. कोमटी जातपंचायतीमुळे कावेटी कुटुंबावर ही वेळ आली.
कावेटी कुटुंबातल्या पांडुरंग कावेटी आणि पेंटम्मा कावेटी या मायलेकराचा मृत्यू झाला. मात्र, कावेटी कुटुंबानं 25 वर्षांपूर्वी ठोठावला 20 हजारांचा दंड न भरल्यानं जातीतल्या लोकांनी त्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नये, असे आदेश जातपंचायत अध्यक्ष सदानंद चपलोलू यांनी दिला.
तसंच अंत्यसंस्कार गेल्यास त्याला जातीबाहेर काढू, अशी धमकीही दिली. त्यामुळे या मायलेकाच्या अंत्यस्काराला जातीतील कुणीच गेलं नाही. गांधीनगरचे भाजप कार्यकर्ते अजय चावरिया यांनी पुढाकार घेतला आणि इतर जातीतल्या लोकांकडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.