गोकुळाष्टमी निमित्त विठुरायाची पंढरपूर नगरी फुलांनी खुलली

गोकुळाष्टमी निमित्त विठुरायाची पंढरपूर नगरी फुलांनी खुलली

 

गोकुळाष्टमीचा सण राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. विठुरायाच्या पंढरपूर नगरीत याचं सणाचंऔचित्य साधून श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक रंगबेरंगी सुवासिक फुले व हारांची सजावट करण्यात आली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेसह परिवार देवता मंदिरात, गाभारा, नामदेव पायरी, पश्चिमद्वार, प्रमुख प्रवेश मार्ग येथे ही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

आज गोकुळाष्टमी श्री कृष्णाचा जन्मदिवस आणि विठुराया हा श्री कृष्णाचा म्हणजेच श्री विष्णूचा अवतार या रंगबिरंगी फुलांमध्ये पांढरी शुभ्र अंगी,निळा पितांबर ,डोक्यावर आवर्जून लावलेला मयूर पंखाने विठुरायाचे रुपं आणखीनच खुलुन दिसत आहे आणि या रुप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version