जान्हवीने उर्फीकडून घेतली प्रेरणा

जान्हवीने उर्फीकडून घेतली प्रेरणा

मुंबई, २७ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडला आपल्या मनमोहक अदांनी वेड लावणारी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या बरीच ट्रोल होते आहे. सहसा जान्हवी तिच्या हटके फॅशन सेन्समुळे बरीच चर्चेत असते. नुकताच तिचा एक फोटो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.या फोटोत तिने थाई-हाय स्लिट बॅकलेस ड्रेस परिधान केला होता.तिला ह्या अवतारात पाहून चाहते नाराज झाले आहेत. अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतंच एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी तिने हिरव्या रंगाचा


थाई-हाई स्लिट बॅकलेस ड्रेस परिधान कला होता. हा ड्रेस पाहून नेटकरी खूप ट्रोल करत आहेत.

जान्हवीचा हा लुक पाहून नेटकरी तिची तुलना उर्फी जावेद हिच्याशी करू लागले आहेत. या व्हिडिओवर बऱ्याच कंमेंट्स येत आहेत. यात एका चाहत्याने लिहिले कि,’उर्फीपासून प्रेरणा घेतली वाटतं’. तर दुसर्‍याने लिहिले, ‘आता सर्वजण उर्फीला कॉपी करत आहेत.’ एकाने लिहिले की, ‘मला वाटले ती उर्फी आहे.’ त्याचवेळी, ‘प्रत्येकाला उर्फीसारखे बनायचे आहे’, अशी कमेंट एका ट्रोलरने केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version