मध्यरात्री जान्हवीचा खुशीसोबत ‘असा’ व्यायाम!

मध्यरात्री जान्हवीचा खुशीसोबत ‘असा’ व्यायाम!

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिच्या जान्हवी आणि खुशी या दोन्ही मुलींच्या फॅन फॉलोइंगमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. ‘धडक’ सिनेमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या जान्हवीनंतर तिची धाकटी बहीण खुशीदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या बेतात आहे. दोघी बहिणींची फॅशन आणि स्टाइल चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरतो.

जान्हवी आणि खुशीचे वर्क-आऊटचे व्हिडिओजही अनेक फॅन्सना आवडतात. वर्क-आऊटबरोबर त्यांची सुरू असलेली गंमत इन्स्टाग्रामवर अनेकदा पाहायला मिळते. जान्हवी आणि खुशीचा नवा व्हिडिओही असाच गमतीदार व्यायामाचा आहे. यात खरंतर व्यायाम खुशी करत आहे. ती स्क्वॉटिंग (उठाबशा) करत आहे आणि जान्हवी चक्क तिच्या पाठुंगळी बसली आहे.

हा व्यायाम जिममध्ये होत नसून त्यांच्या रूममध्ये होताना दिसतोय. कारण या फोटोत ड्रेसिंग टेबलसमोर उभं राहून त्या व्यायाम करत असल्याचं स्पष्ट होतंय. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version